अकलूज येथील जामदार परिवारातील मुळ पुरुष श्री कृष्णात नामदेव जामदार व श्री विठ्ठल दत्तात्रय जामदार हे चुलते पुतणे वारकरी संप्रदायाचे अनुयायी सात्विक प्रवृत्तीचे ‘साधना सेबा व सत्संग’ या जीवनाचे कल्याण करणारी त्रिसूत्रांनी प्रभावित झाले व श्री गुरूमाउलीची जडणघडण त्यांच्या काळात जी घडली त्या स्वरुपाची जोपासना या पिढीने हि धुरा कार्यान्वित ठेवली प.पू. योगीराज सदगुरू श्री गुळवणी महाराजांच्या कृपेने हा कल्पवृक्ष बहरला त्याचे हे आजचे स्वरूप निसर्ग रमणीय परिसर एकांत, नाम ध्यान साधना सत्संगाचे माहेर आहे अनेक श्री संत, भक्त , भाविक योगी सिद्ध पावले व संतचरण यांनीत्यांचे हे साधना सिद्ध स्थळ बनले आहे श्री गुरु परंपरा शास्त्र येथे सर्वोपसर्व असून दैनदिन व उपक्रम हे श्रांत संसारी जीवांना सुख शांती समाधान व आनंद सतत देत राहील अशी विद्यमान व भावी योजना दर्शवितात यातच व्यक्ती विकास साधतो. गुरूमाउलीचा एकूण परिसर अंदाजे २ एकर आहे.
उपासनास्थळ: उपासना, ग्रंथालय, वाचन, ध्यान, साधना, जप, वैयक्तिक साधनेसाठी गुरुमाउली हे एक आदर्श स्थळ आहे.
कृपाशीर्वाद |
योगीराज सदगुरू पू. श्री वामनरावजी गुळवणी महाराज पुणे उत्तराधिकारी श्री वासुदेव निवास,
राष्ट्रीय पंडित प.पु विद्यावाचस्पती
ब्रह्मर्षी पू.श्री.दत्तमहाराज कवीश्वर पुणे उत्तराधिकारी योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज पुणे व नाशिक
इतर वैशिष्ठे |
अ) दरवर्षी जमाखर्च ऑडीट व अहवाल प्रसिद्धी
ब) सभासदांच्या व्याजावर चालणारी संस्था सभासदत्व शुल्क रुपये रु. ५०००/- फक्त. वर्षातून एकदा सांगितलेल्या तिथीवर माधुकरी अन्नदान.
क) आयकर कायदा ८०G अन्वये देणगीवर करसवलत (NEFT/RTGS द्वारा देणगी देण्याची सुविधा)
दैनंदिनी |
प्रतिदिन सकाळी काकड आरती (पहाटे वयक्तिक ध्यान)
श्री अभिषेक दुपारी ११:३० ते १२:०० नामस्मरण “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” ,
श्री आरती, माधुकरी प्रसाद
दुपारी ५:०० ते ७:०० श्री हरीभजन, स्वाध्याय
रात्री ७:०० शेजारती.