प्रतिष्ठानचे उपक्रम

अ) प्रत्येक संकष्टी चतुर्थीस २१ आवर्तने श्री गणेश अथर्व शिर्षाची सामुदायिक श्री अभिषेक करून श्री दुग्धपान.
ब) प्रत्येक शुद्ध व वद्य एकादशीस सकाळी ८:३० ते ११:३० श्री विष्णू सहस्त्रनाम पाठानंतरश्री गीतापाठ.
क)देवांच्या जयंतीस व संतांच्या पुण्यतिथीस नामस्मरण, भजन, प्रवचन व महाप्रसाद.
ख) प्रदोषकाळी सायंकाळी ५.३० श्री भवानी शंकर प्रदोषपूजा, प्रत्येक पोर्णेमेस सकाळी ८.३० श्री सत्यदत्त पूजायासाठी प्रत्येक वेळी नवीन यत्रमान, संकल्प श्री विश्वकल्याणाचा साहित्य व दक्षिणा प्रतिष्ठान पुरविते.
ग) सत्संग – दर गुरुवारी दुपारी १२:१५ ते १:०० दर रविवार सकाळी ८:०० ते ९:०० ध्यान व चिंतन.
घ) सप्ताह रूपाने श्री गुरुपोर्णेमा, श्री दत्तजयंती व पू. श्री गुरुमहाराजांची पुण्यतिथी नामस्मरण, भजन, प्रवचने व महाप्रसाद.
ड) बालसंस्कार शिबीर रिझल्ट नंतर १० दिवस सकाळी प्रार्थना, व्यायाम, स्त्रोत्रपाठांतर, अल्पोपहार श्री संत चरित्र, थोरांच्या गोष्टी, नामस्मरण.
च) अवधूत जपसंकुल: प्रत्येक वाद्य प्रतिपदेस नामस्मरण सकाळी ७:०० ते सायंकाळी ७:०० प्रवचन प्रसाद, आरती, असे नामस्मरण जप संकुलातील सभासदाच्या घरी होते.
छ) प्रतिदिन दुपारच्या आरतीनंतर माधुकरी अन्नदान प्रमुख मोठ्या कार्यक्रमात बुफे पद्धतीने महाप्रसाद.
ज) विविध ठिकाणी पाणपोई.
झ) कार्यस्थळ : वारकरी, भक्त, भाविक, तीर्थयात्री, सर्वांसाठी आषाढी कार्तिकी यात्रेस सत्संग व निवास वापरासाठी दिले जाते.
ट) ‘श्री संतनिवास’ व ‘साधकनिवास’ यथायोग्य वापरासाठी दिला जातो.
ठ) स्वच्छतागृह व प्रसाधन गृह सर्वांच्या वापरासाठी आहे.