श्री संताकडून लाभलेल्या अनमोल प्रसाद भेटी |
१) १९७२ : योगीराज सदगुरू पू.श्री गुळवणी महाराज पंढरपूर क्षेत्रि श्री महापूजेस जाताना लाभलेल्या ‘श्रीपादुका’
२) १९७४ : ब्रम्हर्षी प.पू. दत्तमहाराज कवीश्वर यांच्याकडून लाभलेल्या श्रीपादुका
३ १९७६: प.पू श्री श्री. द. मामा देशपांडे यांचाकडून लाभलेल्या ‘श्रीपादुका’
४) २०१० : योग तपस्वी प.पू. नारायण काका ढेकणे उत्तराधिकारी ‘श्री वासुदेव निवास’ यांचे कडून लाभलेली पू. गुळवणी महाराजांची मूर्ती
५) १९८२ : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी यांनी माउलीच्या संजीवन समाधी सप्त शताब्दी महोत्सवात वीणामंडपात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण केल्या बद्धल स्मुतीपादुका प्रसाद भेट.
६) १९८५: श्री वाराणसी क्षेत्री ‘जंगमवाडी मठात’ श्री कोटी बिल्वार्चन झाले त्यात पू. श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोन्याचे ‘बिल्वपत्र’ प्रसाद भेट दिले.
७) १९७६: पू. श्री गुळवणी महाराज महानिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र स्पर्श झालेली दोन बिल्व पत्रे (आपट्याची पाने एक सुवर्णाचे एक चांदीचे) ब्रम्हर्षी पू.श्री दत्तमहाराज कवीश्वर यांच्या शुभ हस्ते लाभली.
८) १९७२ ; योगीराज प.पू. गुळवणी महाराज यांच्या शुभ हस्ते एक श्री यंत्र व एक श्री दत्त यंत्र (तांब्याचे) ९) १९८८: तांब्याचे मोठे श्री यंत्र प.पू. दत्तमहाराज कवीश्वर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या महापूजेनंतर मिळाले