सिंहावलोकन प्रमुख कार्यक्रमांचे |
अ) सत्संग साधक शिबिरे १९७६, १९७८
उपस्थिति अंदाजे २०० साधक (२ दिवसाचे)
ब) उद्घाटन सत्संग १९७८
शुभहस्ते – प.पू.ब्रम्हर्षीश्री दत्त महाराज कवीश्वर
अध्यक्ष कै. स.म. आमदार श्री शंकरराव मोहिते –पाटील
क) माधुकरी अन्नदान शुभारंभ
दैनंदिन दुपारच्या आरती नंतर उपस्थिताना माधुकरी अन्नदान
शुभहस्ते -प.पू.ब्रम्हर्षी दत्तमहाराज कविश्वर, अध्यक्ष – मा.खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील
ड) यज्ञयाग-श्री गणेश याग १९७८ श्री दत्तयाग १९८० श्री शतचंडी याग १९८२ , श्री दिगंबरा यंत्र हवन १९८६, अतिरुद्र स्वाहाकार१९८८,
इ) श्रीमत भागवत साप्ताह १९८२, १९८५, १९८८ समाप्ती विष्णुयाग ने व विष्णुयाग प्रसाद श्री माधुकरी अन्नदानाचा शुभारंभ वरील प्रत्येक कार्यक्रमात सत्संग नामस्मरण महाप्रसाद
फ) योगीराज सदगुरू श्री वामनराव गुळवणी महाराज मूर्ती भेट ‘श्री वासुदेव निवास’ चे उत्तराधिकारी प.पू नारायण काका ढेकणे महाराज यांचे शुभ हस्ते लाभली. २०१० तिची प्राणप्रतिष्ठा योगीराज वेद विज्ञान आश्रम बार्शी यांनी केली या प्रसंगी विद्यमान उत्तराधिकारी व प्रमुख विश्वस्त श्री शरद शास्त्री जोशी, भागवताचार्य प्रमुख उपस्थिती व शुभाशीर्वाद लाभले २०१०
ह) रौप्य मोहोत्सव १९९९
विविध सत्संग, नामस्मरण, श्री संतपूजा, महाप्रसाद संपन्न झाला
फ) कै.सौ. पुष्पादेवी श्रीनिवास जामदार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भव्य महिला मेळावा नामवंत महिला प्रबोधनकार अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या अध्यक्षतेखली संपन्न झाला जवळ जवळ १००० महिलांनी सहभाग घेतला. त्यातील अत्यंत जेष्ठ व वयोवृद्ध मातोश्रींचा सन्मान (३१) “मातृ शक्ती” सन्मान शाल श्रीफळ देवून केला. यावेळी प्रत्येक महिलेची ओटी भरून प्रसाद, पुस्तिका,तुळस भेट दिली
xक्ष) “विठू ! माझा !! लेकुरवाळा” हा भव्य दिव्य हा महासत्संग विविध कार्यक्रमांनी गाजला. सकाळी श्री विष्णू सहस्त्र नामानेे तुळसी अर्चन, ध्यान सत्संग, कीर्तने, प्रवचने, तीर्थावळीचे अभंग संगीत भारुड यांनी दहा दिवस संपन्न झाला. उपस्थितांची चहा, अल्पोपहार, महाप्रसाद, निवासाची सोय केली. या कार्यक्रमास प.पू.श्री नारायण काकांचे शुभाशीर्वाद लाभले होते व त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांनाच समर्पित झाला “दैवी संपदा” हा गुरु माउलीचा अत्युच्य सन्मान समाजातील नामवंताना झाला श्रीफळ देऊन पू. नामदास महाराजांचे (संतशिरोमणी नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज) शुभहस्ते दिला